#Ballarpur
• एसआयआर संदर्भात बल्लारपूर शहर भाजपाची प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक
सुवर्ण भारत: वैभव मेश्राम
प्रतिनिधी, बल्लारपूर
बल्लारपूर : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सूचनेनुसार एसआयआर संदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बल्लारपूर तहसील कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक दुपारी १ वाजता पार पडली.
बैठकीस उपविभागीय अधिकारी (एसडीओ) अर्जुन पावरा तसेच तहसीलदार रेणुका कोकाटे उपस्थित होत्या. यावेळी एसआयआरशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आवश्यक कार्यपद्धती, प्रशासनाशी समन्वय, तसेच अंमलबजावणीसंदर्भातील विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करून प्रशासनाकडे आवश्यक सूचना व मते मांडण्यात आली.
बैठकीस भारतीय जनता पक्षाचे बीएलए-१ बृजभूषण पाजारे, बल्लारपूर शहराध्यक्ष ॲड. रणंजय सिंह, बल्लारपूर ग्रामीण अध्यक्ष पिंटू देऊळकर, देवाशीष सिंह, ओमप्रकाश प्रसाद, प्रभदीप सचदेवा, सुनील माजी, राहुल अलोने तसेच विनोद यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठक सौहार्दपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. एसआयआर संदर्भातील विविध बाबींवर प्रशासन आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये सखोल व विधायक चर्चा झाली. यावेळी समन्वयातून कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबतही मतांची देवाणघेवाण करण्यात आली.







