Home Breaking News रद्द झालेले सातबारे तात्काळ सुरु करून शेतकऱ्यांना ऑफलाईन सातबारा वर पीक कर्ज...

रद्द झालेले सातबारे तात्काळ सुरु करून शेतकऱ्यांना ऑफलाईन सातबारा वर पीक कर्ज तात्काळ वितरित करा-सुदाम राठोड

26

रद्द झालेले सातबारे तात्काळ सुरु करून शेतकऱ्यांना ऑफलाईन सातबारा वर पीक कर्ज तात्काळ वितरित करा-सुदाम राठोड

प्रतिनिधी -कृष्णाजी चव्हाण.

 

चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील काही सर्व सामान्य शेतकऱ्याकडे सातबारे व पट्टे उपलब्ध आहेत व काही शेतकऱ्यांकडे सातबारे उपलब्ध असून पट्टे उपलब्ध नाहीत, तसेच तालुक्यातील सर्व तलाठी रद्द झालेले सातबारे शेतकऱ्यांना देण्यासाठी नकार देत आहेत, जिवती तालुक्यातील सर्व तलाठ्यांना शेतकरी बांधवाना सातबारा देण्यासाठी आपण आदेशीत करावे, जिवती तालुक्यातील सर्व बँक अधिकारी पट्ट्याची प्रत पीक कर्जासाठी सक्तीने मागत आहे तरी आपण आपल्या स्तरावरून बँक अधिकाऱ्यांना आदेश देऊन जिवती तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना ऑफलाईन सातबारा च्या आधारावर सर्वसामान्य शेतकऱ्यांना पीक कर्ज तात्काळ वितरित करण्याचे आदेश देण्यात यावे असे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड यांनी दिले आहे यावेळी विशाल राठोड, ताजूद्दीन शेख, नंदाताई मुसने, केशवराव राठोड, प्रविण पवार, विनायक पवार उपस्थित होते.