NEET-TET पेपरफुटी आणि सोनम वांगचुक यांच्या अटकेविरुद्ध चंद्रपुरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक; तीव्र धरणे आंदोलन!
चंद्रपूर 🟡🌀किरण घाटे 🌀🟡

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील दादा गव्हाणे यांच्या सूचनेनुसार, चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांच्या मार्गदर्शनात आणि विद्यार्थी अध्यक्ष परब गिरडकर यांच्या नेतृत्वात २० जुलै २०२६ रोजी चंद्रपूर शहरात धरणे आंदोलन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांच्या मदतीने हटवणाऱ्या हुकूमशाही सरकारचा या वेळी तीव्र निषेध करण्यात आला. देशभरातील ‘NEET’ आणि महाराष्ट्रातील ‘TET’ परीक्षांमधील पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायाचा लढा दडपून टाकणाऱ्या या बेजबाबदार आणि असंवेदनशील सरकारच्या धोरणांविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली व प्रशासनाला निवेदन सादर केले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे, भद्रावती नगरपरिषदेचे नगरसेवक फायज शेख, माजी गटनेते संजय वैद्य, आदिवासी सेल शहर अध्यक्ष जनार्दन गेडाम, विधानसभा अध्यक्ष सूरज चव्हाण, अनुप बेले, अनिल मन्ने यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.






