Home Breaking News दिल्ली आंदोलनाचे बल्लारपूर येथे पडसाद महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन : विद्यार्थी व...

दिल्ली आंदोलनाचे बल्लारपूर येथे पडसाद महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन : विद्यार्थी व तरूणांची हेळसांड करणारे शिक्षण व गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी

20
Oplus_131072

दिल्ली आंदोलनाचे बल्लारपूर येथे पडसाद
महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन : विद्यार्थी व तरूणांची हेळसांड करणारे शिक्षण व गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी

सुवर्ण भारत: वैभव मेश्राम (प्रतिनिधी, बल्लारपूर)

विसापूर : देशाची राजधानी दिल्ली येथे जंतर – मंतर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासाजवळ आंदोलन करण्याची तीव्र झाले आहे. या आंदोलनाची धग देशभर पसरली आहे. याचे पडसाद आज गुरुवारी बल्लारपूर येथे उमटले. महाविकास आघाडीच्या वतीने येथील नगरपरिषद चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करुन देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व विद्यार्थी व तरुणांवर अमानुष हल्ला करण्यास कारणीभूत असणारे गृहमंत्री अमीत शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
दिल्ली येथे महिनाभरापासून सीजेपी पक्षाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्र्याच्या राजीनामा घेण्यासाठी जंतर – मंतर वर आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाची धार तीव्र करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुंग यांनी मागील चोवीस दिवसापासून आमरण उपोषण सुरु केले. अठराव्या दिवशी त्यांना दिल्ली पोलीस प्रशासनाने बळजबरी करत दवाखान्यात हलविले. मात्र देशातील विद्यार्थी व तरुणांनी हार मानली नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही. परिणामी विद्यार्थी व तरुणांनी संसदेवर मोर्च्याची हाक दिली. यासाठी देशभरातील विद्यार्थी व तरुण जंतर-मंतर येथून संसदेवर जात असताना अमानुषपणे विद्यार्थी व तरुणांवर लाठी चार्ज, अश्रू धुरांच्या नळकांड्याने हल्ला केला. यामध्ये शेकडोवर विद्यार्थी व तरुणांना जखमी व्हावे लागले.
देशातील विरोधी पक्ष नेते व इंडिया आघाडीचे नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थाना अचानक धरणे आंदोलन केले. यावेळी विरोधी पक्ष नेते राहूल गांधी, प्रियंका गांधी, सपाचे नेते व माजी मुख्यमंत्री अखीलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. याचे पडसाद सर्वरत्र उमटले. याच अनुषंगाने आज बल्लारपूर येथे केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाविरोधात धरणे आंदोलन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. दुपारी १ वाजता पासून संध्याकाळी ४वाजता दरम्यान चाललेल्या धरणे आंदोलन नंतर सर्वांनी मोर्चा काढला. आंदोलनकर्त्यांनी बल्लारपूर येथील तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना निवेदन सादर करुन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व गृहमंत्री अमीत शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्या डॉ. रजनी हजारे,शहर कांग्रेसचे अध्यक्ष अब्दुल करीम,शिवसेना उबाठाचे उपजिल्हा प्रमुख विनोदी ऊर्फ सिक्की यादव,नगराध्यक्ष डॉ.अलका अनिल वाढई,महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते घनश्याम मुलचंदानी,गोविंदा उपरे,नगरपरिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, प्रकाश पाठक,भारत थुलकर,भास्कर माकोडे,अफसाना सय्यद, रोहित चुटे यांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले.
कोट

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासाजवळ धरणे आंदोलन केले. जंतर-मंतर येथील विद्यार्थी व तरुणांच्या आंदोलनाला नैतिक पाठबळ देण्यात आले.जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुंग यांच्या आमरण उपोषणाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. यामुळे विद्यार्थी व तरुणांचा आक्रोश वाढला.याला कारणीभूत केंद्र सरकारचे धोरण आहे. विद्यार्थी व तरुणांना न्याय देण्याऐवजी सरकार दडपशाही करत आहे. आता राजकीय व सामाजिक परिवर्तनाच्या संघर्ष जोर धरत असून केंद्रातील मुजोर सरकार घालविण्याची वेळ आली आहे.
-सुभाष धोटे
अध्यक्ष, जिल्हा ग्रामीण कांग्रेस कमिटी,चंद्रपूर.