Home Breaking News भाजपा चे युवा नेते सुदाम राठोड यांनी जि. प. प्राथ. शाळा सारंगापूर...

भाजपा चे युवा नेते सुदाम राठोड यांनी जि. प. प्राथ. शाळा सारंगापूर येथे भेट देऊन पाहणी केली

31
Oplus_131072

भाजपा चे युवा नेते सुदाम राठोड यांनी जि. प. प्राथ. शाळा सारंगापूर येथे भेट देऊन पाहणी केली

प्रतिनिधी -कृष्णाजी चव्हाण.

जिवती – चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारंगापूर येथे सामाजिक कार्यकर्ते भाजपा चे युवा नेते सुदाम राठोड यांनी शाळेला भेट देऊन शाळेची पाहणी केली व भौतिक सुविधा बाबत शाळा व्यवस्थापन समिती सोबत चर्चा केली असता येथील वर्ग खोली खूप जीर्ण झाली असून इमारतीला ठिकठिकाणी तडे गेलेले आहे स्लॅब झुकलेले आहे विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्ठीने इमारत बसण्यायोग्य नाही वर्ग खोली गळत आहे व पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग एकाच रूम मध्ये भरवत आहे कारण पाऊसामध्ये पूर्ण वर्ग खोली गळत आहे,म्हणून नवीन वर्ग खोली तात्काळ मंजूर करून या चिमुकल्यांचा भविष्य उज्वल करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुदामभाऊ राठोड यांनी राजुरा विधानसभेचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय श्री.देवराव दादा भोंगळे यांच्या सोबत भ्रमणध्वनी द्वारे संवाद साधून मागणी केली व आमदार साहेबांनी वर्गखोली त्वरित मंजूर करण्याचे आश्वस्त केले यावेळी सुदाम राठोड यांच्या सोबत उपस्थित गोपीनाथ राठोड, रोहिदास चव्हाण, बंडू चव्हाण,दगडू राठोड,मधुकर राठोड,तिरुपती राठोड व विशाल राठोड आदी उपस्थित होते.