Home Breaking News कोरपना पोलिसांची धडक कारवाई; १० सुगंधित हुक्का शीशा पाकिटांसह इको वाहन जप्त

कोरपना पोलिसांची धडक कारवाई; १० सुगंधित हुक्का शीशा पाकिटांसह इको वाहन जप्त

28
Oplus_131072

कोरपना पोलिसांची धडक कारवाई; १० सुगंधित हुक्का शीशा पाकिटांसह इको वाहन जप्त

सुवर्ण भारत मोबीन बेग 
कोरपना प्रतिनीधी

कोरपना, दि. २५ जुलै :
कोरपना पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूविरोधात धडक कारवाई करत १० नग सुगंधित हुक्का शीशा पाकिटांसह एक इको वाहन जप्त केले. या कारवाईत एकूण ₹३.१८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या आदेशानुसार कोरपना पोलिसांकडून रात्री वाहन तपासणी व पेट्रोलिंग सुरू असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मोजा काळडगाव फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली. यावेळी एमएच-३४ सीडी-१११० क्रमांकाच्या इको वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये १० नग सुगंधित हुक्का शीशा पाकिटे आढळून आली. पंचनामा करून संबंधित वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या हुक्का शीशा पाकिटांची अंदाजे किंमत ₹१८ हजार, तर इको वाहनाची किंमत ₹३ लाख असून, एकूण ₹३ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील संबंधित कलमान्वये कोरपना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित तंबाखू उत्पादनांच्या अवैध वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक इंद्रवर काटकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांच्या नेतृत्वात पोहे सतवा नामपल्ले, पोहे विशाल मोरे यांनी केली.