जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंगनडोह येथे रंगला विठ्ठल नामाचा गजर

जिवती दिनांक – २५ जुर्ले रोजी आषाढी एकादशी निम्मित जिवती केंद्रातील छोटीशी शाळा लिंगडोह येथे विठू माऊली दिंडी सोहळा. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ -मृदूंगाच्या तालावर विट्टल… विट्टल… जय हरी विट्टल असा अखंड नाम गजर करत.शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी,पालक,उपस्थित होते. विदयार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने दिंडी काढली.गावकऱ्यांच्या प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला…या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बी एस.लांजे ,सहकारी शिक्षिका कु.सुषमा पाटील ,शालेय व्यवस्थापन अध्यक्ष ,उपाध्यक,सदस्य, अंगणवाडी सेविका , मदतनीस,आशा वर्कर उपस्थित होते…हा दिंडी सोहळा लेजिमच्या तालावर उत्साहात पार पडला.विद्यार्थ्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.







