Home Breaking News कवयित्री मंगल मिसाळ यांच्या कवितेचा दर्जा उत्तम असते -मायाताई कोसरे यांचे मनोगत!

कवयित्री मंगल मिसाळ यांच्या कवितेचा दर्जा उत्तम असते -मायाताई कोसरे यांचे मनोगत!

21
Oplus_131072

कवयित्री मंगल मिसाळ यांच्या कवितेचा दर्जा उत्तम असते -मायाताई कोसरे यांचे मनोगत!

नागपूर : सहज सुचलं काव्यकुंजच्या एक कवयित्री कु.मंगल मिसाळ यांच्या कविता अतिशय उत्तम दर्जाच्या असतात असे मनोगत महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका तथा नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे यांनी आज एका छोट्याखाणी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
त्या म्हणाल्या कि त्यांच्या काव्यरचनेत एक वेगळेपण जाणवते !
मंगल मिसाळ ह्या एक शिक्षिका असून त्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत सुसंस्कृतीचे धडे देत आहे.माझ्या हातून चांगला विद्यार्थी घडवा अशी त्यांची अपेक्षा आहे.शालेय विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देत असताना त्यांनी आपल्या शाळेत विविध उपक्रम राबविल्याचे मी स्वतः ऐकले आहे असे मायाताई कोसरे या वेळी म्हणाल्या!

विशेष म्हणजे जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे यांनी देखील या पूर्वी उत्तम व सुरेख लिखाणाबद्दल मंगल मिसाळ यांचे कौतुक केले आहे.
त्यांचे अनेक साहित्य सहज सुचलंच्या माध्यमातून प्रकाशित झाले आहे.हे येथे उल्लेखनीय आहे.