Home Breaking News • सहज सुचलंच्या मुख्य सहसंयोजिका नलिनी आडपवार यांना मिळणार सहज सुचलंच्या मुख्य...

• सहज सुचलंच्या मुख्य सहसंयोजिका नलिनी आडपवार यांना मिळणार सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका होण्याची संधी! • अधिवक्ता मेघा धोटे यांनी दिली माहिती!

22

• सहज सुचलंच्या मुख्य सहसंयोजिका नलिनी आडपवार यांना मिळणार सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका होण्याची संधी!
• अधिवक्ता मेघा धोटे यांनी दिली माहिती!

सुवर्ण भारत : किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर :ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटव

त महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंला पुढे नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला अश्या सहज सुचलंच्या मुख्य सहसंयोजिका नलिनी दिनेश आडपवार यांना सहज सुचलच्या मुख्य मार्गदर्शिकाची संधी मिळत असल्याची माहिती खूद्द अधिवक्ता मेघा धोटे यांनी आज या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
येत्या १५ऑगस्टला या बाबतीत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता धोटे यांनी सांगितले.
मायाताई कोसरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
या बाबतीत सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोडके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.
नलिनी आडपवार यांच्या रिक्त जागेवर मुख्य संयोजिका मोडके यांचे मनोगत जाणून घेतल्यानंतर नविन नियुक्ती त्या जागेवर करण्यात येईल असे समजते.
नलिनी आडपवार यांचे सामाजिक कार्य आज मुल तालुक्यात अनेकांच्या डोळ्यात भरण्या सारखे आहे.त्या मूल नगर परिषदेच्या एक नगरसेविका असून चंदा कामडी व अधिवक्ता हिमानी वाकुडकर यांच्या जिवलग मैत्रिणी आहेत.
दरम्यान किरण घाटे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.