शिवसेना नेते बंडू हजारे यांचा सुरक्षा रक्षकां कडून सत्कार
सुवर्ण भारत : मनोज गोरे
विशेष प्रतिनिधी, चंद्रपूर
गडचांदूर : गडचांदूर येथील लक्ष्मी हॉल मध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांचा सुरक्षा रक्षकां कडून (माणिकगड युनिट सुरक्षा रक्षक) जाहीर सत्कार करण्यात आला.
माणिकगड सिमेंट कंपनी च्या अत्याचारा विरोधात लढाई लढून सुरक्षा रक्षक यांचे बारा तासाऐवजी आठ तासाची ड्युटी सुरळीत सुरू करण्यात आली यामागे बंडू हजारे यांचे मोलाचे योगदान लाभले असून सुरक्षा रक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा अनमोल कीर्तिमान कर्तृत्वामुळे बंडू हजारे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कोरपना तालुक्याचे तालुकाप्रमुख राकेश राठोड आणि गडचांदूर शहर प्रमुख विकी राठोड यांचे सुद्धा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी तालुका प्रमुख (उबाठा गट) चे डॉ. प्रकाश खनके उपस्थित होते
सामान्य कुटुंबात जन्म घेऊन गोरगरिबांसाठी व मराठी लोकांसाठी झटणारे बंडू हजारे यांचा कीर्तिमान असाच उंच वाढत राहो. सामान्य नागरिक, कामगार वर्ग ,शेतकरी वर्ग यांच्यासाठी सतत ते झटत असतात. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचाराची प्रेरणा घेऊन महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आदर्श ठेवून प्रत्येकाला न्याय मिळवण्यासाठी अहोरात्र हजारे भाऊ झटत असतात.







