भरधाव ट्रकच्या धडकेत चार गाईंचा जागीच मृत्यू;
चंद्रपूर: शहर परिसरातील कामगार चौक बायपास

रोडवर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ चरईसाठी जात असलेल्या गाईंच्या कळपाला आंध्र प्रदेश पासिंगच्या भरधाव ट्रकने (क्र. AP-39-UU-6679) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात राधेश्याम यादव यांच्या मालकीच्या चारही गाईंचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, निष्काळजीपणाने वाहन चालवून प्राण्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, याच परिसरात शाळा व महाविद्यालय असूनही बायपासवर वारंवार अपघात घडत असल्याने, प्रशासनाने तातडीने स्पीड ब्रेकर, स्पीड कंट्रोल सिग्नल आणि ब्लिंकर्स बसवावेत अशी तीव्र मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.






