Home Breaking News संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे सीबीएसई साऊथ झोन तायक्वांदो स्पर्धेचा बक्षीस...

संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे सीबीएसई साऊथ झोन तायक्वांदो स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

16

संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे सीबीएसई साऊथ झोन तायक्वांदो स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

वरोरा : संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे आयोजित करण्यात आलेल्या सीबीएसई साऊथ झोन तायक्वांदो स्पर्धेच्या बक्षीस वितरण व सत्कार समारंभाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या प्रसंगी साऊथ झोन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा मेडल व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात योगदान देणारे विविध राज्यांतून आलेले पंच, सीबीएसई ऑब्झर्व्हर टीम, अधिकृत तांत्रिक कर्मचारी, तसेच शाळेच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

समारंभाला वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के, नितीनजी मते, प्रवीणजी मालू, सीबीएसई ऑब्झर्व्हर टीमचे डॉ. दुरई, ज्योती हंकारे, मुकुंद झाला, अतुल जाट, तसेच शाळेच्या प्राचार्या राणी पटेल व उपप्राचार्या श्रद्धा चौबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांनी खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि क्रीडा विभागाने विशेष परिश्रम घेतले.

या समारंभामुळे खेळाडूंचा उत्साह वाढला असून शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे आयोजित बक्षीस वितरण समारंभात राष्ट्रीय स्तरासाठी निवड झालेल्या खेळाडू व मान्यवरांचा सत्कार करताना उपस्थित पाहुणे व शाळा प्रशासन.