Home Breaking News अकोला येथे १९फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रातील सोनार ऐक्याचे दर्शन

अकोला येथे १९फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रातील सोनार ऐक्याचे दर्शन

81

 

शेगाव (प्रतिनिधी ) श्री संत नरहरी महाराज सेवा समिती,अकोला ,श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान,नागपूर ,अखिल माळवी सोनार महासंघ ,आॕल इंडिया सोनार फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती,श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सभामंडप भुमीपूजन सोहळा तसेच ‘पत्रकारांचा सन्मान सोहळा ‘ या कार्यक्रमाचे आयोजन दि. १९फेब्रुवारी २०२२रोजी गुडधी,उमरी,अकोला येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद् घाटनआमदार रणधिरभाऊ सावरकर हे करणार असुन अध्यक्षस्थानी श्री संत नरहरी महाराज सेवा समितीचेअध्यक्ष चंद्रकांतजी हिरुडकर राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणुन आमदार गोवर्धनजी शर्मा,आमदार वसंतशेठ खंडेलवाल ,महापौर सौ.अर्चनाताई जयंतराव मसने,मनपाचे माजी सभापती जयंतभाऊ मसने यांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख उपस्थिती मध्ये शेगाव न.प.चे माजी अध्यक्ष शैलेंद्रदादा पाटील,अकोला सराफा असोसिएशनचे अध्यक्ष शैलेशभाऊ खरोटे,श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान नागपूरच्या अध्यक्षा ह.भ.प. सौ.अंजलीताई सुरेशराव अनासने,भारतीय सुवर्णकार समाज,नागपूर चे कार्याध्यक्ष ओंकारेश्वर गुरव ,शिवसेना मा.अध्यक्ष श्रीरंगदादा पिंजरकर, सोनार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ टकोरे,मा.नगरसेवक संतोषराव अनासने,मा.अध्यक्ष ,मुंबई केशवराव तळोकर,अकोटचे नगरसेवक गजाननराव लोणकर, समाजसेवक अनिलजी काटोले,समाजसेवक प्रविणभाऊ मांडळे,भारतीय सुवर्णकार समाजचे धनराज उज्जैनकर,श्री संत नरहरी महाराज सेवा समितीचे माजी अध्यक्ष श्रीकृष्ण धरमकर,अकोटचे अशोकदादा मुंडगावकर यांचा समावेश आहे.

*महाराष्ट्रातील पत्रकारांचाही मान-सन्मान*

या कार्यक्रमात प्रामुख्याने महाराष्ट्रातील पत्रकारांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रकाशजी माथने (नागपूर ),दिनेश येवले (नागपूर ),विवेक डुबंरे(नागपूर ),संजय हिरुळकर(नागपूर ),उपेंद्र सोनार(मुंबई ),रामरक्षाताई सोनार (मुबंई), आत्माराम ढेकळे (पुणे),धर्मा मैड (शिरुर जि.पुणे),भगवानजी शहाणे (औरंगाबाद ),चंद्रकांत अंबिलवादे (पैठण,जि.औरंगाबाद ), रमाकांत बनसोड (गंगापुर,जि.औरंगाबाद ),राजेंद्र माळवे(नाशिक),जयप्रकाश बागडे(शेवगाव जि.अ.नगर),प्रसाद मैढ (राहुरी,जि.अ.नगर),अनिल शिराळकर(सोलापूर ),भगवान सोनार (बोदवड,जि.जळगाव),धनंजय सोनार (अमळनेर,जि.जळगाव ),कमलाकर कुलथे (माजलगाव,जि.बीड),अॕड.संदीप बेदरे(बीड),बालाजी सुवर्णकार(उदगीर जि.लातुर),विजय बनसोड (गंगापुर जि.औरंगाबाद ),शरद कुलथे(परभणी),अनिल उंबरकर (शेगाव,जि.बुलडाणा),गजानन ठोसर (मलकापुर,जि.बुलडाणा),सिध्दांत उबंरकार(खामगाव,जि.बुलडाणा),प्रशांत उबंरकर (उमाळी,जि.बुलडाणा),संजय प्रांजळे(नांदुरा,जि.बुलडाणा),गजानन इटनारे (अमरावती),श्रीकांतजी पाचकवडे (अकोला),अंकीत कन्हे (कारंजा,जि.अकोला),विशाल डहाळे(महागांव,जि.यवतमाळ),संतोष शहाणे(परभणी)आदी पत्रकारांचा याप्रसंगी सन्मान होणार आहे.
आयोजित विविध कार्यक्रमात श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी ऊत्सव सकाळी ७ते९आरती व होम,छत्रपती शिवाजी महाराज जयंती ऊत्सव व सभामंडप भुमीपूजन सकाळी १०-३०वा. यानंतर सकाळी ११वा. “पत्रकारांचा सन्मान सोहळा” संपन्न होणार आहे.
या आयोजित कार्यक्रमात महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे अखिल माळवी सोनार महासंघाचे अध्यक्ष विलासराव अनासने,श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानचे सहसचिव अनंतराव उंबरकर,आॕल इंडिया सोनार फेडरेशनचे अध्यक्ष मोहनसेठ हिवरकर तसेच “श्री संत नरहरी महाराज सेवा समिती”चे पदाधिकारी चंद्रकांतजी हिरुडकर(अध्यक्ष ) ,गोपालराव लोणकर (कार्याध्यक्ष),जयकृष्णराव माळोकर(उपाध्यक्ष),ओमप्रकाश मानेकर(उपाध्यक्ष),प्रमोद बुटे(कोषाध्यक्ष),अरविंद तळोकर(सचिव),रमेश प्रांजळे(सहसचिव),रमेश बानुबाकडे (सहसचिव),गजानन उज्जैनकर(सदस्य),पुरुषोत्तम चेडे(सदस्य),गजाननराव माळोकर(सदस्य ),तपेश्वर शेरेकर (सदस्य),संजय बानुबाकडे(सदस्य) आदींनी आवाहन केले आहे.