Home Breaking News Ballarpur city @news • १५ दिवसांत रेल्वे पूल सुरू होईल,...

Ballarpur city @news • १५ दिवसांत रेल्वे पूल सुरू होईल, विभागीय रेल्वे अभियंत्यांनी अजय दुबे यांना दिले लेखी आश्वासन

574

Ballarpur city @news

• १५ दिवसांत रेल्वे पूल सुरू होईल, विभागीय रेल्वे अभियंत्यांनी अजय दुबे यांना दिले लेखी आश्वासन

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपुर:बल्लारशाह रेल्वे स्टेशनचा फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) येत्या १५ दिवसांत प्रवाशांसाठी खुला केला जाईल, असे पद्मनाभ झा, वरिष्ठ विभागीय अभियंता (दक्षिण), मध्य रेल्वे, नागपूर यांनी अजय दुबे, सदस्य, राष्ट्रीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार परिषद यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. गेल्या वर्षी झालेल्या दुर्घटनेनंतर तात्पुरती डागडुजी करून नवीन पूल बांधतानाच हा पूल बंद करण्यात आला होता.

याची सुरुवात करण्यासाठी अजय दुबे यांनी नागपूर, मुंबई आणि नवी दिल्ली येथील रेल्वे अधिकाऱ्यांना सातत्याने बैठका आणि पत्रव्यवहार करून दुरुस्तीच्या कामाला गती देण्यास भाग पाडले. पुलावर लोखंडी पत्रा टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता ब्लॉक घेण्याची गरज भासणार नाही. ज्यावर आता काँक्रीटीकरण होणार आहे. २५ ते ३० जून दरम्यान हा पूल प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.