Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपुर युवासेना तर्फे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त...

Ballarpur city@ news • बल्लारपुर युवासेना तर्फे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

253

Ballarpur city@ news
• बल्लारपुर युवासेना तर्फे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपूर :- शिवसेनेचे युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांचा १३ जून रोजी वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच अनुषंगाने बल्लारपूर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शासकीय रुग्णालय बल्लारपूर येथील रुग्णांना फळे वाटप व इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू व सत्कार करण्यात आला.
बल्लारपूर युवासेना अधिकारी तालुका प्रमुख नीरज यादव यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. शहर समन्वयक अनिकेत बेलखोडे, सोनू श्रीवास सहमहिला शहर समन्वयक अंजली सोमबंसी व तालुका प्रमुख प्रकाश पाठक, शहरप्रमुख बाबा शाहू, महिला आघाडीच्या विधानसभा समन्वयक कल्पना गोरघाटे, तालुका संघटीका मीनाक्षी गलघट, शहर संघटीका ज्योती गेहलोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.

यावेळी तालुकाप्रमुख प्रकाश पाठक, शहरप्रमुख बाबा शाहू, ज्येष्ठ शिवसैनिक प्रभाकर मुरकुटे, उपशहरप्रमुख शेख युसूफ, आनंद हनमंतू, रामू मेदरवार, सोनू श्रीवास, अनिकेत बेलखोडे, महिला विधानसभा समन्वयक कल्पना गोरघाटे, तालुकाप्रमुख मीनाक्षी गलघट, शहर प्रमुख ज्योती गेहलोत, युवती सेना प्रमुख अंजली सोमबंसी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.