Ballarpur city@ news
• बल्लारपूर वेकोलि काटा घर मधून ६ बॅटऱ्या चोरी, गुन्हा दाखल
बल्लारपूर :- वेकोलिच्या बल्लारपूर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वेकोलि चे सुरक्षा रक्षक लाखोंचा पगार घेणारे चोरांना पकडण्यात अपयशी ठरत आहेत. कामगारांना सुरक्षा रक्षक म्हणून ठेवले जात आहे. आवारात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून फुटेज गायब होत आहे.
बुधवारी रात्री बी.सी ३ आणि ४ पिटच्या शाखेतून ६ बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी रात्री बी.ओ.सी.एम मॅनेजरच्या केबिनमधून ६ बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना घडली होती त्यात तात्काळ बल्लारपूर पोलिसांनी कारवाही केली होती. आता ६ बॅटरी काटा घर मधून चोरी गेली असून सुरक्षा रक्षक वर शंका निर्माण होत आहे.चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक पोलीस तपास करत आहेत.


