Home Breaking News ◻️🔸वेडा कुंभार🔸◽ ♦️कुमारी वंदना बोढे सहज सुचल...

◻️🔸वेडा कुंभार🔸◽ ♦️कुमारी वंदना बोढे सहज सुचल काव्यकुंज सदस्य

47

◻️🔸वेडा कुंभार🔸◽

♦️कुमारी वंदना बोढे
सहज सुचल काव्यकुंज सदस्य

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

शिक्षका तू वेडा कुंभार
गुरूच्या ठायी तुझे स्थान
तुज आहे केवढा मान
खरोखरच सर्वाधिक तू महान….

लहान थोर वंदी तुला
आदर्शवत तू सर्वांचा रे
मूक कळ्याना फुलविण्याचा
छंद तुझा आगळा रे

निर्मळ, निरागस बालके सारी
मानी तुज माय बापापरी
दिसभर तुझ्या छायेखाली
करि वाचन,लेखन, मस्करी

कुणी चतुर भारी पोरे
काही असती साधे भोळे
कुणा अंगी गुण कोणते
तुला कसे काय कळे?

देव मानी तू सानं लेकरांना
हसत खेळत शिकवी त्यांना
देई वाव सुप्त गुणांना
वसा आवडे तुझा सर्वांना

♦️कुमारी वंदना बोढे
सहज सुचल काव्यकुंज सदस्य