Home Breaking News • लाॅयड्स मेटल्सने उभारले बेलसनी गावात जलशुद्धीकरण केंद्र

• लाॅयड्स मेटल्सने उभारले बेलसनी गावात जलशुद्धीकरण केंद्र

96

• लाॅयड्स मेटल्सने उभारले बेलसनी गावात जलशुद्धीकरण केंद्र

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर

घुग्घुस : दि.१४ जानेवारी २०२५ मंगळवार रोजी बेलसणी गावात लाॅयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुस व लाॅयड्स इनफिनाइट फाऊंडेशन यांच्या समाजिक दायित्व विभाग अंतर्गत आधुनिक आर.ओ. जलशुद्धीकरण पाणी पुरवठाचे लोकार्पण करण्यात आले.
या जलशुद्धीकरण केंद्रामुले ग्रामस्थांना शुद्ध आणि आरोग्यदायी पाणी मिळणार असून, पाणीजन्य आजारांवर नियंत्रण मिळू शकेल.
या लोकार्पण सोहळ्यास उदघाटक म्हणून लॉयड्स मेटल्स चे मानव संसाधन विभागाचे महाप्रबंधक कौशिक घोष,कार्यक्रमाचे अध्यक्ष बेलसणी येथील सरपंच सौ. इंदिराबाई पोळे, विशेष अतिथी म्हणून लॉयड्स मेटल्स चे मानव संसाधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक तरुण केशवाणी, मंगेश लोडे, नितीन नरळ, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ,आणि स्थानिक अधिकारी उपस्थित होते.
महाप्रबंधक कौशिक घोष यांनी आपल्या भाषणातून बोलण्यात आले की, या यंत्रणेचे महत्त्व विशद केले आणि ग्रामस्थांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
त्यांनी सांगितले की,या आर.ओ. यंत्रणेमुळे ग्रामस्थांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल.
तरुण केशवाणी यांनी मार्गदर्शन करताना जलशुद्धीकरण केंद्राचा वापर ग्रामस्थांनी योग्य प्रकारे करावा जेणेकरून याचा फायदा जास्त काळ घेता येईल, असे सांगितले. त्यांनी कंपनीला गावाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आभार मानले.
बेलसणी येथील सरपंच सौ. इंदिराबाई पोळे यांनी संपूर्ण गावाच्या वतीने लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुस आणि लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनचे मनापासून आभार मानले आणि जलशुद्धीकरण केंद्रामुळे गावातील लोकांना शुद्ध पाणी मिळेल व गावात पाण्यामुळे होणारी रोगराई कमी होईल अशी आशा व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लॉयड्स मेटल्सचे अनुराग मत्ते, अरविंद चौधरी,रमण पानपटे, सौ.लता बावणे.सौ.प्रिया पिंपळकर ,सौ.मंजुषा वडस्कर,सौ. मनिषा बरडे ,सौ.ममता मोरे ,सौ. अश्विनी खोब्रागडे यांनी प्रयत्न केले.