Home Breaking News • साक्षी जयस्वालने स्वतः सोबत बल्हारपूरचे नाव रोशन केले ! • नागपूरात...

• साक्षी जयस्वालने स्वतः सोबत बल्हारपूरचे नाव रोशन केले ! • नागपूरात तिने Ms.India Queen Of Nation 2025 Winner चा किताब पटकावला! • देशभरातून आलेल्या अनेक स्पर्धकांना साक्षीने टाकले मागे! • कलाक्षेत्रातील अनेक मंडळींकडून होतोय साक्षीवर अभिनंदनाचा वर्षाव!

220

• साक्षी जयस्वालने स्वतः सोबत बल्हारपूरचे नाव रोशन केले !
• नागपूरात तिने Ms.India Queen Of Nation 2025 Winner चा किताब पटकावला!
• देशभरातून आलेल्या अनेक स्पर्धकांना साक्षीने टाकले मागे!
• कलाक्षेत्रातील अनेक मंडळींकडून होतोय साक्षीवर अभिनंदनाचा वर्षाव!

सुवर्ण भारत: किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनीधी)

बल्लारपूर : मॅजेंटा क्रिएशन्स तर्फे “Miss & Mrs. India – Queen of Nation 2025” या भव्य सोहळ्याचे आयोजन विदर्भाच्या नागपूर येथील हॉटेल रीजेंटा सेंट्रलमध्ये करण्यात आले होते.
देशभरातून आलेल्या स्पर्धकांनी आपल्या कलागुणांचे, आत्मविश्वासाचे आणि व्यक्तिमत्वाचे सुंदर दर्शन या ठिकाणी घडविले.
या प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरच्या साक्षी जयस्वालने हिने अतुलनीय कामगिरी करत “Ms. India Queen of Nation 2025 Winner” हा मानाचा किताब जिंकला.
या विजयामुळे तिने केवळ आपल्या कुटुंबाचा अभिमान वाढवला नाही, तर बल्लारपूर शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे .साक्षीने मंचावरील आपली तेजस्वी उपस्थिती, आत्मविश्वास ,आणि प्रभावी व्यक्तिमत्वाने परीक्षक व उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
तिला या वेळी विजेतेपदाचा मुकुट, ट्रॉफी, आणि पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनुप्रिया गोयंका (Padmaavat, Tiger Zinda Hai, War, Asur, Aashram फेम) Celebrity Guest म्हणून या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित होत्या.
आयोजकांनी सांगितले की, हा मंच केवळ सौंदर्यस्पर्धा नसून महिलांना आपली कला, विचार आणि ध्येय समाजासमोर मांडण्याची संधी देतो. विजेत्यांना पुढे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

विजयाबद्दल साक्षी जयस्वालचे मनोगत –
“हा किताब माझ्यासाठी अभिमान आणि प्रेरणेचे प्रतीक आहे. मिळालेला पुरस्कार -मी बल्लारपूर आणि आपल्या देशातील प्रत्येक “त्या” महिलेला समर्पित करते कि जी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे.”

पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कलाक्षेत्रातील अनेक मंडळींनी साक्षीचे तोंडभरून कौतुक करत अभिनंदन केले आहे.
सहज सुचलं परिवार तर्फे साक्षीचे अभिनंदन!
महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे,अधिवक्ता मेघा धोटे, शैला चिमड्यालवार, साधना धकाते, रंज्जू दिलीप मोडक, नलिनी आडपवार ,किरण साळवी, ऐश्वर्या मांदाडे, शिवानी झाडे, साक्षी वाडगूरे, रजनी रणदिवे,चंदा कामडी, अर्चना चावरे, स्नेहा मडावी, चैताली आतराम, कविता दिकोंडवार, संजीवनी धांडे, अधिवक्ता अंजली गुंडावार, सविता कोट्टी, वैजयंती गहुकर, मंगल मिसाळ, सीमा पाटील, उज्वला निमगडे, श्रध्दा परिमल,पोर्णिमा किर्तीवार, हिमानी वाकुडकर, अधिवक्ता सारिका टेंभरे ,अंजली इटनकर, अंजली खंडाईत -कोसुरकर , ज्योती मोरे, रश्मि हिवरे, रश्मी डाहुले, भाग्यश्री हांडे, अश्विनी दीक्षीत, प्रांजू मखरे आदिंनी साक्षीचे अभिनंदन करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.