ओबीसी समाजाच्या 27% आरक्षणात दिलेले” मराठा कुणबी “आरक्षण रद्द करण्याची मागणी
चंद्रपूर ◼️किरण घाटे
परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा
चंद्रपूरची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली.
या बैठकीत दारू व्यसनमुक्तीवर जनजागृतीपर मेळावे,रॅली,संदेश पत्रक इत्यादी होणाऱ्या कार्यक्रमांसोबतच नुकत्याच दिलेल्या ओबीसी समाजाच्या 27 टक्के आरक्षणात मराठा कुणबी समाजाचे आरक्षण जोडून त्याला मंजुरी दिली या विषयावर चर्चा झाली.ओबीसी समाजावर हा अन्याय असून पहिलेच ओबीसी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा समाज जास्तीत जास्त मागासलेला समाज आहे. या समाजात मध्यमवर्गीय व गरीब व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शासनाचे जे पूर्वी पासून चालत आलेले 27 टक्के आरक्षण या समाजाच्या संख्येनुसार कमी असून त्यानुसार येथील समाजाला आरक्षण चा फायदा फारच कमी होतो.आता मराठा कुणबी हा समाज या आरक्षणात समाविष्ट केल्याने ओबीसी समाजावर हा अन्याय झाला असून मराठा कुणबी या संख्येची भर पडल्यामुळे हा समाज अजून मागासलेपणाकडे जाईल सरकारला तसेच महाराष्ट्र शासनाला या बैठकीच्या माध्यमातून संघटनेच्या ओबीसी बांधवाकडून मागणी
करण्यात येत आहे की,मराठा कुणबी या आरक्षणाला दिलेले मंजुरी तात्काळ रद्द करावी असे बैठकीत एकमताने ठरवण्यात आले. तसेच बैठकीनंतर मुख्यमंत्री
देवेंद्र फडवणीस व जिल्हाधिकारी विनय गोडा यांच्याकडे वरील मागणीचे एक निवेदन देण्यात आले.यावेळी परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर ओबीसी समाज बांधव अनिल डोंगरे, भाऊराव ठाकरे लक्ष्मीकांत धानोरकर,दिगंबर वासेकर आकाश क्षीरसागर , प्रिया बुटले .श्रीकृष्ण पिंपळकर मारुती वाकुलकर गौरव चापले ,राजू लडके प्रदीप जवादे अशोक ठाकरे प्रशांत जबाडे भाऊ चापले ,नामदेव ढोले आदिं उपस्थित होते.





