Home Breaking News गडबोरी गावात बिबट्याचा कहर – अंधाऱ्या रात्री रक्ताचे डाग, सकाळी सापडली आठ...

गडबोरी गावात बिबट्याचा कहर – अंधाऱ्या रात्री रक्ताचे डाग, सकाळी सापडली आठ वर्षीय मुलाची प्रेते; गावात भीती व संतापाचे वातावरण

56

गडबोरी गावात बिबट्याचा कहर – अंधाऱ्या रात्री रक्ताचे डाग, सकाळी सापडली आठ वर्षीय मुलाची प्रेते; गावात भीती व संतापाचे वातावरण

सुवर्ण भारत: किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनीधी)

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात गुरुवारी रात्री भीषण घटना घडली. गावातील ८ वर्षीय प्रशील मांनकर गणेशोत्सवाचे जेवण आटोपून कुटुंबासह घरी परतत असताना घराच्या उंबरठ्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. क्षणभरातच त्याला काकाच्या हातातून हिसकावून जंगलात घेऊन गेला.

संपूर्ण रात्र गावकरी टॉर्चच्या प्रकाशात शोध घेत होते. मात्र हात लागले ते फक्त कपडे व रक्ताचे डाग. या घटनेने गावात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. शेवटी सकाळी काटेरी झुडपांत प्रशीलचे मृतदेह आढळले. बिबट्याने शरीराचे काही भाग फाडले होते. हे दृश्य पाहून गावात आक्रोश पसरला, महिलांचा हंबरडा फोडला तर पुरुषांच्या डोळ्यात संताप उसळला.

ग्रामस्थांनी वनविभागाच्या निष्क्रियतेवर रोष व्यक्त केला आहे. अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर परिसरात सुरू असूनही अधिकारी दुर्लक्ष करत होते, असा आरोप करण्यात आला. सुरक्षिततेची हमी मिळेपर्यंत मृतदेह कुणालाही न देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

सध्या गडबोरी गावात मातम आणि दहशतीचे सावट आहे. महिला व लहान मुले भीतीने घराबाहेर पडत नाहीत, तर पुरुष आक्रोशाने भरलेले आहेत. ग्रामस्थांचा एकच प्रश्न – “आपण अजून किती दिवस या खूंखार जनावरांच्या दहशतीत जगणार?”