Home Breaking News #Chandrapur • आज मंगळवारला करणार नगरसेवक पदासाठी मीनाक्षी गुजरकर व लता हिवरे...

#Chandrapur • आज मंगळवारला करणार नगरसेवक पदासाठी मीनाक्षी गुजरकर व लता हिवरे नामांकन पत्र दाखल!

121
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

#Chandrapur
• आज मंगळवारला करणार नगरसेवक पदासाठी मीनाक्षी गुजरकर व लता हिवरे नामांकन पत्र दाखल!

चंद्रपूर : किरण घाटे

येत्या 15 जानेवारीला चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे.
मंगळवारी नगरसेवक पदासाठी जटपूरा प्रभाग सात मधून मीनाक्षी संजय गुजरकर व महाकाली प्रभाग क्रमांक बारा मधून सरदार पटेल महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका लता विलास हिवरे ह्या नामांकन पत्र दाखल करणार असल्याचे त्यांनी खुद्द या प्रतिनिधीशी आज संध्याकाळी बोलताना सांगितले.

सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या मीनाक्षी गुजरकर ह्या काँग्रेस पार्टीच्या वतीने ही निवडणूक लढवित असून त्यांचा प्रचार जोरात सुरू असल्याचे या प्रभागातील काही मतदारांनी एका भेटी दरम्यान सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पार्टीने घवघवीत यश मिळविल्याने काँग्रेसचे नेते मंडळी,पदाधिकाऱी व कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढला आहे.
विकासाच्या मुद्यावर काँग्रेसने नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणूका लढवित मोठे यश संपादन केले असल्याचे सर्वश्रूतच आहे.
“घर ते घर “असा प्रचार मीनाक्षी गुजरकर यांनी निवडणूक घोषीत होताच सुरू केला आहे.
प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटीबद्ध राहणार असल्याची ग्वाही देखील त्या मतदारांना देत आहे.
सध्या तरी त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.