
#Ballarpur
• बल्लारपूर के.जी.एन. स्कूल व ज्युनियर कॉलेज चे क्रीडाशिक्षक रमेश नातरंगी यांना दोन सुवर्ण पदकांचा मान
सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर : ४६ वी महाराष्ट्र राज्य मास्टर्स अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२५ चे आयोजन मास्टर्स अॅथलीट असोसिएशनच्या वतीने २६ ते २८ डिसेंबर दरम्यान वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर करण्यात आले. या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत बल्लारपूर येथील के.जी.एन. पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच चंद्रपूर येथील क्रीडाशिक्षक रमेश नातरंगी यांनी उल्लेखनीय कामगिरी करत परिसराचा नावलौकिक वाढवला.
या स्पर्धेत रमेश नातरंगी यांनी हाय जंप आणि पोल व्हॉल्ट या प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावत दोन सुवर्ण पदके, तर लाँग जंप प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य पदक पटकावले. अशा प्रकारे त्यांनी एकूण तीन पदकांची कमाई केली.
या यशाच्या जोरावर रमेश नातरंगी यांची २८ जानेवारीपासून केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वीही त्यांनी स्पेन, श्रीलंका, मलेशिया आणि म्यानमार येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
या घवघवीत यशाबद्दल के.जी.एन. पब्लिक स्कूलचे संस्थापक आसिफ महमूद, प्राचार्या स्वाती वाघमारे, उपप्राचार्या सीमा माकडे, श्वेता डोनेवार, अहेनाज खलीक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


