
• मला सहज सुचलंच्या जेष्ठ मार्गदर्शिकांकडून बरंच काही शिकायला मिळाले – कु.नूपुर मोडक
• सहज सुचलंचे येत्या 1 जानेवारीला थाटात 12 व्या वर्षात पदार्पण
◾चंद्रपूर -किरण घाटे◾
मला तीन वर्षांपासून सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिकांकडून बरंच काही शिकायला मिळालं !
मी आज त्या परिवारातील एक घटक आहे.सहज सुचलंच्या सर्व सदस्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे मी आज एक प्रगतीचा शिखर गाठला असे मत मुंबईच्या प्रख्यात चित्रकार कु.नूपुर दिलीप मोडक यांनी व्यक्त केले.
नव वर्षात सहज सुचलं थाटात 12व्या वर्षांत थाटात पदार्पण करीत आहे .
◾सहज सुचलंचा प्रवास असाच अविरतपणे सुरू राहावा अश्याही चित्रकार नूपुर मोडक शेवटी म्हणाल्या!


