Home Breaking News ४८ तासांच्या सखोल चौकशीनंतर पोलिसांना आले यश; ट्रॅक्टर चालकास घेतले पोलिसांनी ताब्यात!

४८ तासांच्या सखोल चौकशीनंतर पोलिसांना आले यश; ट्रॅक्टर चालकास घेतले पोलिसांनी ताब्यात!

52
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

४८ तासांच्या सखोल चौकशीनंतर पोलिसांना आले यश; ट्रॅक्टर चालकास घेतले पोलिसांनी ताब्यात!

गोंडपिपरी (चंद्रपूर)
चंद्रपूर -किरण घाटे
चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली येथील दाम्पत्य रविवारी (दि. २८) दुपारी चेकफुटाना या गावाकडे गोंडपिपरी–वढोली मार्गाने एम .एच. ३४ बीटी ५४१६ दुचाकीने निघाले असताना डांबर प्लांट जवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली होती.दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात आयुषी विपुल नागपुरे (वय ६) ही चिमुकली गंभीर जखमी झाली. आई-वडील आणि लहान बहिणीसह तिला तातडीने गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आयुषीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अपघातात जखमी पालक व लहान बहिणीची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले.अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेऊन अज्ञात वाहनाचा शोध सुरू करण्यात आला.झालेल्या अपघातप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१) बीएनएस तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरहु गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस विभागाने गोंडपिपरी वडोली, घाटकुळ,ताररडा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बारकाईने तपासणी केली.तसेच तब्बल १२ साक्षीदारांची चौकशी करण्यात आली.
तपासादरम्यान हा अपघात ट्रॅक्टर क्रमांक MH ३३ AC २०३० चा चालक व मालक कमलेश हरिश्चंद्र परसोडे रा. गणपूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली याने केल्याचे निष्पन्न झाले.दि.(३०)मंगळवारी पोलिसांनी सदरहू आरोपीस ताब्यात घेतले. अखेर हा गुन्हा उघडकीस आला आहे.
ही संपूर्ण कामगिरी ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा रॉय, पोलीस अमलदार सुनील गव्हारे व सचिन मोहुर्ले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. नववर्षात अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वाहन चालवावे व कायद्याचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.