Home Breaking News श्री.सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लबच्या वतीने नववर्षाच्या पावन पर्वानिमित्त भक्तीमय वातावरणात वस्त्रदान व...

श्री.सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लबच्या वतीने नववर्षाच्या पावन पर्वानिमित्त भक्तीमय वातावरणात वस्त्रदान व प्रसाद वाटप

130
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

श्री.सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लबच्या वतीने नववर्षाच्या पावन पर्वानिमित्त भक्तीमय वातावरणात वस्त्रदान व प्रसाद वाटप

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : नवीन वर्ष २०२६ च्या मंगलमय व पावन प्रारंभी    आमदार  सुधीर मुनगंटीवार व सौ. सपना सुधीर मुनगंटीवार यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य तसेच सुखी व समृद्ध जीवनासाठी बल्लारपूर शहरात भक्तीमय वातावरणात धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

नववर्षाच्या शुभारंभाच्या निमित्ताने शहरातील ऐतिहासिक व श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिर व शिव मंदिर येथे विशेष धार्मिक कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब, बल्लारपूर यांच्या वतीने मंदिरातील महाराजांना विधीपूर्वक वस्त्रदान करण्यात आले. त्याचबरोबर दर्शनासाठी आलेल्या असंख्य भाविकांना प्रसादाचे वाटप करून सेवाभावाचा संदेश देण्यात आला.

नववर्षाची सुरुवात ईश्वरभक्ती, समाजभान आणि सेवाभावाने व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमामुळे मंदिर परिसरात भक्ती, उत्साह आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे अभिनंदन केले.

या धार्मिक व सामाजिक उपक्रमास फॅन्स क्लबचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी सुनील यादव, कमल वर्मा, सुरज गुंगले, मिलाप यांच्यासह फॅन्स क्लबचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी नववर्षानिमित्त शुभेच्छा देत अशा समाजोपयोगी, धार्मिक व सेवाभावी उपक्रमांची परंपरा पुढेही कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.

हा उपक्रम म्हणजे श्रद्धा, सेवाभाव आणि सामाजिक एकात्मतेचे सुंदर दर्शन घडविणारा ठरला असून नववर्षाच्या सुरुवातीसच सकारात्मक संदेश देणारा असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त करण्यात आली.