Home Breaking News बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार ! ग्रामीण भागात बिबट्याची दहशत कायम

बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार ! ग्रामीण भागात बिबट्याची दहशत कायम

45

• बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार !

• ग्रामीण भागात बिबट्याची दहशत कायम

नागभीड (चंद्रपूर)
◾किरण घाटे ◾
तळोधी (बा .) येथून जवळच असलेल्या नांदेड येथील मनोहर बोन्डो चावरे यांच्या गोठ्यात बांधून असलेल्या शेळ्यावर रात्री बिबट्याने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. ही घटना घरातील व्यक्तींच्या लक्षात येतात त्यांनी घराबाहेर निघून गोठ्याकडे धाव घेतली असता बिबट्याने तीन शेळ्या फस्त केल्याचे दिसले.
लगेच त्यांनी आरडाओरड केली तेव्हा बिबट्या तिथून पळून गेला.
सदरहु घटना 2 जानेवारीला रात्री तीन वाजताच्या दरम्यान घडली. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
त्यामुळे इतर पशुपालकांना आपल्या जनारांचे रक्षण करणे फार कसरतीचे काम झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडून फटाके फोडण्यात येत आहे. पण या बंदोबस्ताने बिबट्या ऐकत नसल्याने त्याचा बंदोबस्त तातडीने करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी गावकऱ्यांची मागणी आता जोर धरू लागली आहे.
या भागात बिबट्यांचे हल्ले हे नेहमीच होत आहेत. चावरे यांच्या तीन शेळ्या ठार केल्याने त्यांचे साठ हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे . उपरोक्त माहिती वनविभागाला कळविण्यात आली. त्यानंतर पंचनामा करून मृतक शेळ्यांना जमिनीत पुरण्यात आले. बिबट्याच्या कायम बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी गावकरी मंडळी कडून सातत्याने होत आहे.