Home Breaking News #Ballarpur • बल्लारपूर नगरपालिकेच्या शाळांसाठी रंगरंगोटी व सीसीटीव्ही बसविण्याची मागणी •...

#Ballarpur • बल्लारपूर नगरपालिकेच्या शाळांसाठी रंगरंगोटी व सीसीटीव्ही बसविण्याची मागणी • श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबचे नगराध्यक्ष अल्का वाढई यांना निवेदन

133

#Ballarpur
• बल्लारपूर नगरपालिकेच्या शाळांसाठी रंगरंगोटी व सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

• श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबचे नगराध्यक्ष अल्का वाढई यांना निवेदन

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर शहरातील नगरपालिकेच्या शाळांसाठी महत्त्वाची

बातमी आहे.
शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आकर्षक शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.
नगरपालिका शाळांची रंगरंगोटी करण्यासह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी करणारे निवेदन नगरपरिषद अध्यक्षा सौ. अल्का वाढई यांना सादर करण्यात आले.
या मागणीची गंभीर दखल घेत लवकरच आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी सकारात्मक ग्वाही नगराध्यक्षा अल्का वाढई यांनी दिली आहे.
या उपक्रमामुळे पालकवर्गातून समाधान व्यक्त होत असून, शहरातील शैक्षणिक वातावरण सुधारण्यास याचा निश्चित फायदा होणार आहे.

यावेळी निवेदन देताना संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली कमल वर्मा, रितेश गुप्ता, रिंकू चव्हाण, मिलाप, कुणाल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.