Home Breaking News #Ballarpur • KGN पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले जयंती...

#Ballarpur • KGN पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले जयंती श्रद्धा व उत्साहात साजरी

78

 


#Ballarpur

• KGN पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले जयंती श्रद्धा व उत्साहात साजरी

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर येथील KGN पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसुधारक व नारी शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे संस्थापक आसीफ महमूद यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेविका छाया मडावी तसेच नगरसेवक अ‍ॅड. पवन मेश्राम उपस्थित होते. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या स्वाती वाघमारे, उपप्राचार्या सीमा माकडे, श्वेता डोनेवार यांच्यासह शिक्षकवर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतून त्यांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे, नाट्यप्रयोग व सादरीकरणे करून महिला शिक्षण, सामाजिक समता व शिक्षणासाठी केलेल्या संघर्षांचे प्रभावी चित्रण केले.

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवून समाजाला प्रगतीचा मार्ग दाखविला, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणालाच परिवर्तनाचे प्रभावी साधन मानावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरला वेलपुरी व मोहिनी काकड यांनी केले. प्रेरणादायी संदेशासह कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थित सर्वांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संकल्प व्यक्त केला.