
पारस जेन्टस पार्लर शेगाव येथे क्रांतिसूर्य ज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली…
तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती : शेगांव (बू )येथील सूपरिचित असलेले नाभिक समाजचे कार्यकर्ते व तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी तथा पारस जेट्स पार्लरचे चालक होमराज घुमे यांच्या दुकानामध्ये भारतातील पहिली स्त्री शिक्षिका.भारतीय समाजसुधारक. शिक्षणतज्ज्ञ तसेच कवयित्री असलेल्या सावित्रीबाई फुले मानली जाते.पति ज्योतिराव फुले यांच्यासमवेत त्यांनी भारतातील महिलांचे हक्क मिळवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली.जात – धर्म आणि लिंगांवर आधारित लोंकावरील भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक दूर करण्याचे काम त्यांनी केले महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीत त्यांना एक महत्त्वाचे स्थान आहे. सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांनी पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली भारतीय मुलींची शाळा सुरू केली. महिलांसाठी शिक्षणाचे व्दार उघडणाऱ्या अशा या महान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करणा़यात आली यावेळी शेंगाव पोलीस स्टेशनचे जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य असलेले आदरणीय उमेशभाऊ माकोडे नाभिक समाजाचे कार्यकर्ते धनराज भाऊ घुमे माळी समाजाचे नेतृत्व करणारे आणि अध्यक्ष असलेले सचिनभाऊ फुलकर, अरविंद लाजेंकर तसेच वरोरा तालुका संघटक सचिनभाऊ रासेकर,होमराज घुमे,किसनजी पाडेवार प्रकाश भाऊ खांदारे,प्रकाश भाऊ सोनार्थी, व राजूभाऊ बोकडे इत्यादि मान्यवर यावेळी उपस्थित होते.


