सरला प्रतिक कुळसंगे निवडणूक रिंगणात;
तुकूम प्रभागातून भाजप–शिवसेना युतीच्या उमेदवार
चंद्रपूर : किरण घाटे
चंद्रपूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होत असून, या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ दे.गो. तुकूम येथून सरला प्रतिक कुळसंगे या भाजप–शिवसेना युतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवीत आहेत.
प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी रविवारी एका मुलाखतीत स्पष्ट केले. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा तसेच युवक व महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरला कुळसंगे यांचा प्रचार सध्या प्रभागात जोरात सुरू असून, नागरिकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.



