• जटपूरा प्रभाग सात मध्ये काँग्रेसचा प्रचार जोरात!
• काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतली प्रचारात आघाडी!
चंद्रपूर -किरण घाटे
येत्या १५जानेवारीला चंद्रपूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

दरम्यान या प्रभागात नगरसेवक पदासाठी काँग्रेसच्या वतीने अश्विनी निखिलेश खोब्रागडे,मनोज वासेकर , मिनाक्षी संजय गुजरकर व इंजिनिअर रमिझ शेख निवडणूक मैदानात उतरले आहेत.
सध्या ह्या प्रभागात चारही काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू असल्याचे आज रविवारी प्रत्यक्षात दिसून आले.
कांग्रेस पार्टीने सध्या तरी प्रचारात आघाडी घेतली आहे.
घर ते घर कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचार करीत असून ही महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, व माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली ते लढवित आहे.


