#Bhadravti
•तीन दिवसीय उपक्रमांतून शेगाव (बु) येथे महिला मुक्ती दिन व सावित्रीबाई फुले जयंती साजरी
तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर

भद्रावती : महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच, शेगाव (बु) यांच्या वतीने महिला मुक्ती दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीन दिवसांचे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
दि. १ जानेवारी २०२६ (गुरुवार) रोजी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. दि. २ जानेवारी रोजी सायंकाळी सुप्रसिद्ध सप्तखंजरी वादक प्रदीप पाल चौधरी यांचे जाहीर प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रबोधनातून समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला.
दि. ३ जानेवारी रोजी सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. सायंकाळी सहा वाजता स्नेहभोजन कार्यक्रमाने या तीन दिवसीय कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महात्मा ज्योतिबा फुले युवा मंचचे अध्यक्ष सचिन फुलकर यांच्यासह अरविंद लाजेकर, प्रफुल वाढई, शुभम सहारे, शंकर फुलकर, गजानन शेंडे, सचिन रासेकर तसेच मंचाचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले


