Home Breaking News विवेकानंद विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

विवेकानंद विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

47

विवेकानंद विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर

भद्रावती : स्थानिक विवेकानंद माध्यमिक विद्यालया

०३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक दयाकर मग्गीडवार होते.
प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षिका आशा गावंडे आणि विवेकानंद विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका मेघा ताजने मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.
मंचावर उपस्थित मान्यवरांच्या स्वागतानंतर विद्यालयातील आस्था बारतीने, मीरा गुप्ता, लावण्या खेडेकर, नियती भोंडे, नव्या माथनकर, प्रतिभा कोरे, हृषीकेश भोई, क्रिष्णा पवार आदी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित भाषणे केली.
प्रमुख अतिथी आशा गावंडे आणि मेघा ताजने यांनी आपल्या भाषणातुन सावित्रीबाई फुले यांच्या मुलींच्या शिक्षणातील भरीव योगदानाविषयी माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक दयाकर मग्गीडवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या संघर्षमय जीवनाची क्रांतिकारी गाथा ऐकवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इयत्ता ८ वी ची विद्यार्थिनी श्रेया खोब्रागडे हिने केले.
वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.