Home Breaking News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चंद्रपूर येथे भव्य रोड शो…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चंद्रपूर येथे भव्य रोड शो…

72
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चंद्रपूर येथे भव्य रोड शो…

प्रतिनिधी : राजेश येसेकर

चंद्रपूर : महानगरपालिका निवडणूक 2026 च्या

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राच्या जनतेचे लोकप्रिय, विकासाभिमुख व दूरदर्शी नेतृत्व असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा भव्य रोड शो पार पडला, हा रोड शो अत्यंत उत्साहात आणि अभूतपूर्व जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी चंद्रपूरचे आराध्यदैवत माता महाकालीचे दर्शन घेऊन त्यांनी चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांच्या प्रगती व कल्याणासाठी प्रार्थना केली. त्यांच्या उपस्थितीमुळे चंद्रपूर शहराला नवी ऊर्जा आणि नवा आत्मविश्वास मिळाला.आंचलेश्वर गेट, गांधी चौक मार्गे जटपुरा गेटपर्यंत झालेल्या या भव्य शो-ऑफ-स्ट्रेंग्थमध्ये उत्स्फूर्त घोषणा, जनतेचा अपार प्रतिसाद आणि विकासाच्या दृढ संकल्पाची स्पष्ट झलक पाहायला मिळाली.

या ऐतिहासिक रोड शो मध्ये राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, आमदार. बंटी भांगडिया, आमदार करन देवतळे, तसेच शिवसेना नेते किरण पांडव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सोबतच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुख्यमंत्री नेतृत्वाखाली चंद्रपूरच्या विकासयात्रेला नव्या दिशेने गती देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. यावेळी विविध सामाजिक संघटना आणि विविध सामाजिक कार्यकर्ते सामान्य नागरिक यांच्या वतीने जागोजागी रॅलीचे मुख्यमंत्रीचे स्वागत करण्यात आले.