
भटाला येथे अवैध दारू विक्री विरोधात महिलांचा ऐल्गार.
आरोपी शेगाव पोलिसांच्या जाळ्यात
तालुका प्रतिनिधी – राजेश येसेकर भद्रावती
भद्रावती : वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भटाला येथे गावातील सर्व एकत्र आलेल्या महिलांच्या पुढाकारातून अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यास रंगेहात पकडुण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून गावातील महिलांनी अवैध दारू विक्रेत्यावर लक्ष ठेवून होत्या. आज पहाटे साडेसात वाजण्याच्या सुमारास सदाशिव जनार्दन जाधव वयवर्षे ५५, रा. भटाला याला दारू विक्री करत असताना महिलांनी धाड टाकून पकडले.
शासकीय जागेवर गावकऱ्यांनी उभारलेल्या झोपडीत लपवून ठेवलेली दारू विक्रीसाठी साठवण्यात आली होती. कारवाईदरम्यान आरोपीकडून ९० एम एलच्या ५४ बाटल्या व रोख रक्कम २,५८० रुपये असा मुद्देमाल जप्त करून महिलांनी आरोपीसह शेगाव पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले.
या प्रकरणाची माहिती मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचा ताफा घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला. त्यानंतर सदाशिव जनार्दन जाधव यास अटक करून पुढील कारवाईसाठी शेगाव पोलीस स्टेशनला सुपूर्त करण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिलीप पोले, हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर कोकाटे व पोलीस कॉन्स्टेबल नितेश गजबे करीत आहेत.
गावातील महिलांनी दाखवलेल्या धाडसामुळे अवैध दारू विक्रीवर आळा बसण्यास मदत झाली असून त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करत नागरिकांत उत्सहाचे वातावरण दिसून येत आहे.


