Home Breaking News सहज सुचलं महिलांचा एकमेव व्हाॅट्सअप गृप – प्रियंका चिताडे

सहज सुचलं महिलांचा एकमेव व्हाॅट्सअप गृप – प्रियंका चिताडे

193

सहज सुचलं महिलांचा एकमेव व्हाॅट्सअप गृप – प्रियंका चिताडे

चंद्रपूर -विशेष प्रतिनिधी

सहज सुचलं हा एकमेव महिलांचा व्हाॅट्सअप गृप असल्याचे मनोगत चंद्रपूर शहरातील समाजसेविका प्रियंका चिताडे यांनी आज एका मुलाखती दरम्यान बोलताना व्यक्त केले.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्या बद्दल शहरातील विविध संघटना व सामाजिक संस्थेतर्फे आज पर्यंत त्यांना अनेक सन्मान पुरस्कार बहाल करण्यात आले आहे.
सहज सुचलं गृपला कला, क्रीडा, शैक्षणिक, संगीत व साहित्यिक क्षेत्रातली महिला व तरुणी सहभागी असून या गृप वरील जेष्ठ सदस्यांनी कलावंतांना व महाविद्यालयीन तरुणींना नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.

मायाताई कोसरे , अधिवक्ता मेघा धोटे, रंज्जू मोडक, व नलिनी आडपवार ह्यांचे कार्य अतिशय अभिनंदनीय व कौतुकास्पद असल्याचे प्रियंका चिताडे यांनी या वेळी बोलताना सांगितले.