Home Breaking News #Ballarpur • बल्लारपुरात पोलिसांची धडक कारवाई; कॉलरी परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न...

#Ballarpur • बल्लारपुरात पोलिसांची धडक कारवाई; कॉलरी परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न हाणून पाडला! • धारदार शस्त्रांसह दोघांना फिल्मी स्टाईलने घेतले ताब्यात; पोलिसांच्या सतर्कतेने टळला अनर्थ

96

#Ballarpur

• बल्लारपुरात पोलिसांची धडक कारवाई; कॉलरी परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न हाणून पाडला!

• धारदार शस्त्रांसह दोघांना फिल्मी स्टाईलने घेतले ताब्यात; पोलिसांच्या सतर्कतेने टळला अनर्थ

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : शहरातील कॉलरी परिसरात धारदार शस्त्रांच्या बळावर दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा समाजकंटकांचा डाव बल्लारपूर पोलिसांनी उधळून लावला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आलेल्या या धडक कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तलवार आणि कोयता जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे शहरात होऊ घातलेला संभाव्य अनर्थ टळल्याची चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास बल्लारपूर पोलीस गस्तीवर असताना त्यांना सरदार पटेल वॉर्ड परिसरात काही इसम संशयास्पदरीत्या वावरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने कॉलरी ग्राउंड परिसरात सापळा रचला. यावेळी दोन इसम हातात उघडी शस्त्रे घेऊन फिरताना आढळले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना घेराव घालून जेरबंद केले.

हिरा  बहुरीया वय ४४, रा. श्रीराम वॉर्ड, बल्लारपूर, रामजित  राजभर वय ५२, रा. सरदार पटेल वॉर्ड, बल्लारपूर, पोलिसांनी आरोपींकडून ८२.५ सें.मी. लांबीची लोखंडी तलवार आणि ५६ सें.मी. लांबीचा लाकडी मुठीचा कोयता जप्त केला आहे. ही शस्त्रे अत्यंत धारदार असून ती गुन्हेगारी उद्देशानेच बाळगली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
> पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींची भंबेरी
> परिसरात दहशत पसरवून सर्वसामान्यांवर वचक निर्माण करण्याचा या दोघांचा इरादा होता. मात्र, पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अत्यंत चतुराईने ही कारवाई केली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र कायद्याच्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धाडसी कारवाई पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि अभिषेक जंगमवार, संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, प्रविण निकोडे, मोहन निषाद, पंकज शिंदे, संतोष दंडेवार, विकास जुमनाके, सचिन अल्लेवार, लखन चव्हाण, खंडेराव माने, गुरू शिंदे, मिलिंद आत्राम, शरद कारूष व अनिता नायडू यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
शहरात शांतता भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.