Home Breaking News आयशर ट्रक मध्ये अवैधपणे घेऊन जाणाऱ्या १० जनावरांना केले मुक्त वरोरा पोलिसांची...

आयशर ट्रक मध्ये अवैधपणे घेऊन जाणाऱ्या १० जनावरांना केले मुक्त वरोरा पोलिसांची मोठी कारवाई बजरंग दलाच्या सतर्कतेने गोवंश तस्करीचा प्रयत्न फसला ५ लाखाचा मुद्देमाल जप्त

26

आयशर ट्रक मध्ये अवैधपणे घेऊन जाणाऱ्या १० जनावरांना केले मुक्त वरोरा पोलिसांची मोठी कारवाई

बजरंग दलाच्या सतर्कतेने गोवंश तस्करीचा प्रयत्न फसला ५ लाखाचा मुद्देमाल जप्त

सुवर्ण भारत:शंकर महाकाली

वरोरा : नागपुरवरून जाममार्गे वरोरा चंद्रपूर रोडणे गोवंशिय जनावरांची वाहतूक करण्यात येत आहे अशी गोपनीय माहिती टेमुर्ड्यावरून वरोरा पोलिसांना मिळाली. यामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची मोलाची कामगिरी असून गोमातेची हत्या होऊ नये यासाठी यासाठी कार्यकर्ते सक्रिय असतात. विश्वसनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला आणि नागपुरकडून येणारे अशोक लेलँड कंपनीचे बडा दोस्त मलवाहक गाडी क्र.MH 34-BZ – 7194 हे वाहन संशयरित्या दिसल्याने थांबविण्यात आले.सदर चालकाने वाहन थांबवून पसार झाला.त्याचा पाठलाग केला असता तो मिळून आला नाही.सदर गाडीची पाहणी केली असता गाडीचे मागील डाल्यात 10 गोवंशिय जनावरे आढलून आले.जनावरांमध्ये एक कालवड होते ते मृत अवस्थेत आढळले .वाहन व जनावरे असा एकूण 5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.गाडीच्या चालकाचा शोधात पोलीस आहेत.अज्ञात चालकाविरुद्ध वरोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून गोवंशिय जनावरे वाहतूक करण्याचे कामात कोण्ही मोठे मासे यामध्ये गुंतले आहे का?गोवंश तस्करीचे मोठे रॅकेट असू शकते याबाबत तपास सुद्धा पोलीस करीत आहे. गोवंशिय जनावरांचे गाडी अडवून पोलिसांना टेमुर्डा येथील बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी सहकार्य केले असल्याची माहिती आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज वासाडे हे करीत आहे.