जुन्या स्मृतींना उजाळा देत स्नेहमिलन सोहळा संपन्न
जनता ज्युनियर कॉलेज घुग्घूस येथील १९९५-९६ बॅच चे ऋणानुबंध झाले अधोरेखित
घुग्घुस: बालपण आणि शालेय आठवणी म्हणजे भूतकाळातील भारावलेले दिवस, अर्थात ‘वो ख्वाबो के दिन… किताबो के दिन’ सवाले की राते जबाबो के दिन ‘ एकूण भावनात्मक,अल्लड पना, रोमांच, हसतखेळत शालेय जीवन, या गतकालीन स्मृती ना पुन्हा एकदा उजाळा मिळावा या हेतू ने जिल्ह्यातील घुघूस येथील १९९५..९६ च्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन दिनांक ०५ रोजी शहरातील प्रयास लॉन येथे पार पडले.
विशेष म्हणजे सर्वप्रथम ज्या शाळेने संस्कार दिले त्याच शाळेच्या त्याच वर्गातून आपला श्रीमान व सौभाग्यवती चा प्रौढपणा विसरून गतकालीन शालेय वर्तनाला साजेसे वर्तन करीत तत्कालीन गुरुजनां च्या उपस्थितीत स्नेहमिलनाची सुरवात करण्यात आली.
प्रयास लॉन येथे संपन्न सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य प्रा.धोपटे तर प्रमुख अतिथी माजी मुख्याध्यापक, प्रा.बोबडे माजी मुख्याध्यापक मोहन गंधारे, जेष्ठ माजी शिक्षक वाघमारे, उप प्राचार्या अनघा पालपत्तुवार, माजी प्राचार्य प्रा.संजू पठाण, प्रा. लिमेश माणूसमारे आदी उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांनी तत्कालीन सर्वच गुरुजनांचा सत्कार करून गुरू व शिष्य परंपरा जोपासली. प्रसंगी गुरुजनांनी मार्गदर्शन करताना ९५-९६ बॅच मधील सर्वच विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव केला. राजकीय, व्यावसायिक, नौकरी क्षेत्रात नामवंत झाले हेच आमच्या शिकवणीची खरी पावती होय असे आवर्जून सांगितले.
अत्यंत भावपूर्ण वातावरणात एकमेकांशी संवाद साधत जुन्या स्मृतींची अक्षरशः उधळण करीत स्नेहमिलन पार पडले.या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त करीत हे ऋणानुबंध कायम जपू असा मानस व्यक्त केला.सलग ३१ वर्षानंतर एकत्र आलेल्या संवगड्यां ना बघून
सर्वच अक्षरशः भावनिक झाले होते.
‘उजाले अपनी यादो के हमारे साथ रहने दो.. न जाने किस गली मे जिंदगी की श्याम हो जाए ” अशी मार्मिक भावना व्यक्त करीत आणि मोठ्या आत्मविश्वासाने ‘कभी अलविदा ना कहना ” परत भेटूच असे अभिवचन घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
व्हॉट्सॲप च्या माध्यमातून विखुरलेले मोती एका माळेत आणण्याची जबाबदारी संयोजक श्रीनिवास इसारप व सागर तांड्रा यांनी पार पाडली तर उत्तम सूत्र संचालनाचा भार, विशाल नगराळे, उमेश मेश्राम, यमुना पाटील ,पंचशीला भरणे यांनी उचलला. तर भावपूर्ण स्नेहमिलनाच्या यशस्वितेकरिता संजय तगराम ,संतोष कोडपेल्लीवार, श्रीनिवास कोत्तुर,विनोद चौधरी,, विवेक पडवेकर, गंगाधर गायकवाड, रामचंद्र टोंगे, कुणाल चिवंडे, प्रणय मानकर ,किरण बांधुरकर, सलीम, सचिन चिवंडे, , सविता इसारप ,भारती सज्जनवार, पिंकी तामगाडगे, रजनी लिपटे, शांता देठे, सुनीता देवगडे यांच्या विशेष योगदान सह सर्व माजी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात सहकार्य केले.







