Home Breaking News भाजपा स्थापना दिनानिमित्त बल्लारपूरमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

भाजपा स्थापना दिनानिमित्त बल्लारपूरमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

174

भाजपा स्थापना दिनानिमित्त बल्लारपूरमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

सुवर्ण भारत:शंकर महाकाली

बल्लारपूर: भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त बल्लारपूर येथील भाजपा कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि गरिमामय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली असून परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.

या प्रसंगी वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थित सर्वांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर विशेष उत्साह आणि अभिमान दिसून येत होता.

कार्यक्रमास चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा तसेच भाजपा शहराध्यक्ष व महिला-पुरुष बूथ सशक्तीकरण अभियान प्रमुख ॲड. रणंजय सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या मनोगतात त्यांनी पक्षाच्या स्थापना दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत, पक्षाच्या राष्ट्रवादी विचारसरणीचा प्रसार, सेवा कार्य आणि जनकल्याणाच्या धोरणांवर अधिक भर देण्याचे आवाहन केले. त्यांनी कार्यकर्त्यांना संघटन बळकट करण्यासाठी अधिक सक्रिय राहण्याचे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये शहर महामंत्री मनीष पांडे, देवा वाटकर, ज्येष्ठ नेते लखनसिंह चंदेल, शहर उपाध्यक्ष प्रभदीप सचदेवा, गुलशन शर्मा, हरिबाबू लंका, शहर सचिव नफीस अन्सारी, सुरेंद्र खडका, बबलू गुप्ता, पूनमचंद बहुरिया, नगरसेवक नीरज झाडे, मोहित डंगोरे, येल्ल्या दसरफ, शुभम रहिक्वार, युवा मोर्चा अध्यक्ष मिथलेश खेंगर, एससी मोर्चा अध्यक्ष व नगरसेवक महेंद्र ढोके, सोनाल तोडेकर, ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष सोनू दरी, ओमप्रकाश शाह, फर्दीन शेख, मुन्ना ठाकूर, संजू मुपिडवार, श्रीनिवास कंदकुरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महिला मोर्चाच्या वतीने ज्येष्ठ नेत्या रेणुका दुधे, महामंत्री आरती अक्केवार, कांता ढोके, सारिका कनकम, जयश्री मोहुर्ले, नगरसेविका शालू कुम्हरे, सुरेखा श्रीवास्तव, बूथ प्रमुख वनीता चक्रवाती, दीपमाला यादव, गायत्री हिरण, उत्तरा सोंत्ताके, नजमा खान, सुनीता निवलकर, सोनाली भटारकर, ज्योती येनुमल्ला तसेच सोशल मीडिया प्रमुख प्रियंका जाधव यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

युवा मोर्चाचे महामंत्री रामेश्वर पासवान, अरविंद दुबे, सचिव अजय खोब्रागडे, श्रीकांत परका, अनिल यादव, यशनील मंथनवर, अरविंद कश्यप, सुजल नागरे, सुनील कोडशेट्टीवर, पुष्पेंद्र वर्मा, रमेश सूर्यवंशी, नितीन बौरा, राहुल अलोन यांच्यासह अनेक युवा कार्यकर्त्यांनीही उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा, समाजसेवा वाढविण्याचा आणि आगामी उपक्रम यशस्वी करण्याचा सामूहिक संकल्प केला. राष्ट्रगीताने या भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.