Home Breaking News मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर; नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांत नाराजी #Ghugus

मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर; नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांत नाराजी #Ghugus

58

मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर; नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांत नाराजी #Ghugus

सुवर्ण भारत : पंकज रामटेके सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : नगरपरिषद क्षेत्रात मोकाट जनावरांचा वाढता वावर नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील प्रमुख रस्ते व चौकांमध्ये जनावरे मुक्तपणे फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून वाहतूक पोलीस व होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीत शिस्त दिसत असली तरी मोकाट जनावरांच्या समस्येकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

चंद्रपूर-वणी मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी व डिव्हायडरवर जनावरे दिसत असल्याने वाहनधारकांना सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी धोका अधिक वाढत आहे.

नगरपरिषदेने तातडीने उपाययोजना करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.