Home Breaking News “संविधानाच्या मूल्यांचे जतन म्हणजेच बाबासाहेबांना खरी आदरांजली” – नरेश पुगलिया

“संविधानाच्या मूल्यांचे जतन म्हणजेच बाबासाहेबांना खरी आदरांजली” – नरेश पुगलिया

92

“संविधानाच्या मूल्यांचे जतन म्हणजेच बाबासाहेबांना खरी आदरांजली” – नरेश पुगलिया

सुवर्ण भारत : शंकर महाकाली

चंद्रपूर, दि. १४ एप्रिल २०२६ :
भारताचे संविधान शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने गांधी चौक येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात व भावपूर्ण वातावरणात पार पडला.

माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेते राहुलबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात आयोजित या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेत डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. यावेळी उपस्थितांनी पुष्पांजली वाहत कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी बोलताना नरेशबाबू पुगलिया म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून, ते सामाजिक न्याय, समानता आणि लोकशाहीचे भक्कम अधिष्ठान आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच भारताची लोकशाही आजही सक्षमपणे उभी आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, स्वातंत्र्य आणि न्यायाची हमी दिली आहे.”

ते पुढे म्हणाले, “डॉ. आंबेडकर यांनी आयुष्यभर वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी संघर्ष केला. सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची रुजवात करून त्यांनी समाजाला नवी दिशा दिली. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचे आचरण करूनच आपण खऱ्या अर्थाने समतामूलक आणि प्रगत समाजाची उभारणी करू शकतो. त्यामुळे बाबासाहेबांचे आदर्श जपणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”

Oplus_131072

कार्यक्रमास जिल्हा महासचिव अशोक नागापूरे, शहराध्यक्ष देवेंद्र बेले, चंद्रशेखर पोडे, स्वप्नील तिवारी, पंकज गुप्ता, श्रीनिवास पारनंदी, सुधाकरसिंह गौर, अजय महाडोळे, अनिल तुगीडवार, विरेंद्र आर्या, गजानन दिवसे, सुभाष माथनकर, रतन शिलावार, अरुण बुरडकर, विनोद पिपळशेडे, अमोल हलदर, निताई घोष, अनंता हुड, पृथ्वी जंगम, बाबुलाल करुणाकर, धिरज सिंग, श्रीकांत पुप्पलवार, महेश ठोबरे, अमोल गावंडे, शेखर कोतपल्लीवार, सतीश नेरवटला, यादव शंभरकर, सुनिल दुबे, मनोज बावीस्कर, अनुप संधू, विठ्ठल खरडकर, अनंत पाल, मोहम्मद अंकूश, मोहम्मद फरिद यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, बाबासाहेबांच्या जयघोषांनी गांधी चौक दुमदुमून गेला.