Home Breaking News आलापल्लीत आय्यप्पा स्वामी महापडीपूजा भक्तिभावात संपन्न राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची उपस्थिती;...

आलापल्लीत आय्यप्पा स्वामी महापडीपूजा भक्तिभावात संपन्न राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची उपस्थिती; धार्मिक वातावरणात भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग

134

आलापल्लीत आय्यप्पा स्वामी महापडीपूजा भक्तिभावात संपन्न

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची उपस्थिती; धार्मिक वातावरणात भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग

Oplus_131072

सुवर्ण भारत: शंकर महाकाली

गडचिरोली : आलापल्ली
येथील आय्यप्पा स्वामी मंदिरात जन्म नक्षत्र तिथीनिमित्त आयोजित महापडीपूजा सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मंत्रोच्चार, भजन-कीर्तन आणि पारंपरिक धार्मिक विधींनी वातावरण पूर्णपणे भारावून गेले होते.

या पवित्र कार्यक्रमास अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आवर्जून उपस्थिती लावली. त्यांनी आय्यप्पा स्वामींचे दर्शन घेऊन विधिवत पूजा-अर्चा केली आणि गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या सुख-शांती, समृद्धी व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

यावेळी बोलताना त्यांनी, “आय्यप्पा स्वामींच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि प्रगती नांदो,” अशी भावना व्यक्त केली. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याच्या उत्साहात आणखी भर पडली.

या महापडीपूजा कार्यक्रमास कुमार अवधेशराव बाबा आत्राम, भाजपचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच आय्यप्पा स्वामींचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आलापल्लीतील हा सोहळा केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न राहता, भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर संगम ठरला.