Home Breaking News चंद्रपूरच्या नव्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे उत्साहपूर्ण स्वागत

चंद्रपूरच्या नव्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे उत्साहपूर्ण स्वागत

123
Oplus_131072

चंद्रपूरच्या नव्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे उत्साहपूर्ण स्वागत

सुवर्ण भारत : किरण घाटे विदर्भ विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्याच्या नव्याने नियुक्त झालेल्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे सोमवारी दुपारी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच कला क्षेत्रातील उपक्रमांना सतत प्रोत्साहन देणाऱ्या ‘सहज सुचलं’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत केले.

हे स्वागत समारंभ संस्थेच्या मुख्य मार्गदर्शिका समाजसेविका मायाताई कोसरे आणि ज्येष्ठ साहित्यिक तथा अधिवक्ता मेघा धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील सामाजिक व सांस्कृतिक चळवळींना बळ देण्यासाठी प्रशासनाशी सकारात्मक समन्वय ठेवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

या प्रसंगी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधत, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक संस्थांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. विविध क्षेत्रातील उपक्रमांना प्रशासनाकडून सहकार्य मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

कार्यक्रमास योग शिक्षिका व समाजसेविका रंज्जू दिलीप मोडक, ‘सहज सुचलं काव्यकुंज’च्या मुख्य संयोजिका विद्या पिंजरकर, अभियंता प्रियंका गायकवाड, सेवानिवृत्त प्राध्यापिका लता हिवरे, कवयित्री प्रियंका बेन्द्रे, प्रियंका चिताडे तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.