Home Breaking News ब्रम्हपुरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; विविध स्पर्धांनी कार्यक्रमाला रंगत

ब्रम्हपुरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; विविध स्पर्धांनी कार्यक्रमाला रंगत

47

ब्रम्हपुरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; विविध स्पर्धांनी कार्यक्रमाला रंगत

सुवर्ण भारत: रोहित मेश्राम
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी

ब्रह्मपुरी:- 15 एप्रिल: विदर्भ इस्टेट-3, ब्रम्हपुरी येथे परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव समिती व बौद्ध संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 13 व 14 एप्रिल रोजी कम्युनिटी हॉल येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता दीपप्रज्वलन व बुद्ध वंदनेने झाली. त्यानंतर सर्व वयोगटांसाठी गीत गायन, भाषण, रांगोळी, सामान्य ज्ञान, चित्रकला व नृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना बालकांपासून महिलांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भव्य भीम रॅलीनंतर मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी रतन चहांदे होते, तर उद्घाटक म्हणून मा. मुन्नी शेडे उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून संघरक्षक डांगे, हिरालाल बन्सोड व केश्विनी गोंडाने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विशेष अतिथी म्हणून घनश्याम कुळमेथे, मनोहर राठोड, मोरेश्वर कुर्वे, पुण्यवता मेश्राम, प्रमोद बन्सोड, धनंजय मेश्राम, भागनबाई गावडकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन हा सोहळा गुण्यागोविंदाने पार पाडला. ‘भीमगीत’ आधारित एकल व सामूहिक नृत्य स्पर्धांनी कार्यक्रमात विशेष रंग भरला. विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आम्रपाली लोखंडे, अर्चना रामटेके, वनमाला चौधरी, कल्याणी बन्सोड, प्रिती मेश्राम, जयमाला बारसागडे, कंचन खोब्रागडे, दिपाली धोंगडे व निलिमा कोचे यांनी विशेष परिश्रम घेतले.

दोन दिवसीय या कार्यक्रमाची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या जागराने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रमोद बन्सोड यांनी केले, सूत्रसंचालन पुण्यवता रामटेके यांनी केले, तर आभार प्रदर्शन छन्ना खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला व बालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.