Home Breaking News 21 एप्रिल पासून राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक बेमुदत संपावर!

21 एप्रिल पासून राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक बेमुदत संपावर!

101

21 एप्रिल पासून राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक बेमुदत संपावर!

चंद्रपूर( विदर्भ)
🟧किरण घाटे विशेष प्रतिनिधी🟧

राज्य सरकारी , जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दि. 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संपावर जाणार आहे.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलने करण्यात आली. परंतु मागण्या अजूनही प्रलंबित आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील “एकस्तर पदोन्नती व प्रोत्साहन भत्ता” पुर्ववत सुरू राहण्याकरीता शासनाने सुधारीत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे, लिपीकांच्या वेतन त्रृटी दूर करुन पदोन्नतीचे टप्पे कमी करावे, सुधारीत पेन्शन योजना दिनांक 1 मार्च 2024 पासून लागू करण्याची घोषणा झाली परंतु त्या संदर्भातील नियम व कार्यपध्दती निश्चित करा, चार कामगार संहीता रद्द करा, 8 व्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षेचा आढावा घेणे तसेच 18 प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिनांक 21 एप्रिल 2026 पासून राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

संपाच्या अनुषंगाने तालुका स्तरावरील शासकीय कार्यालयांमध्ये तसेच चंद्रपूर येथील प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी तथा कर्मचारी यांच्या यशस्वी प्रचार सभा घेण्यात आल्या. जिल्हा कोषागार कार्यालयासमोर घेण्यात आलेल्या सभेमध्ये सुमारे 500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा उत्स्फुर्त सहभाग होता. त्यात संपातील मागण्यांबाबतची पार्श्वभुमी स्पष्ट करण्यात आली.

बेमुदत संपाला जिल्हा तथा तालुकास्तरावर 100 टक्के पाठींबा देवून संपात प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा व संप यशस्वी करावा असे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिपक जेऊरकर, राजु धांडे, श्रीकांत येवले, अजय मेकलवार, राकेश शेंडे, सीमा पॉल, अतुल किनेकर, अमोल शिंदे, शैलेश धात्रक, अजय चहारे यांनी केले आहे.