Home Breaking News ।।🔶 बालकृष्णाचे आगमन🔶 ।। ⛔ शिवानी झाडे ⛔ ◽कवयित्री चंद्रपूर◽

।।🔶 बालकृष्णाचे आगमन🔶 ।। ⛔ शिवानी झाडे ⛔ ◽कवयित्री चंद्रपूर◽

77

।।🔶 बालकृष्णाचे आगमन🔶 ।।

⛔ शिवानी झाडे ⛔
◽कवयित्री चंद्रपूर◽

इवल्या इवल्या पावलांनी, आला कृष्ण माझ्या दारी
स्वागत आहे तुझे …आपल्या या सुंदर घरी ,

पहिल्या दिवशी बघून तुला ….डोळे ही पाणावली
दुःख माझे विसरून मी…. तुलाच बघत राहिली ,

मन आतुर झाले तुला बअघायसाठी
म्हणून धाववत आले मी ….ब्रम्हपुरी ,

तुझे खरोखर रूप बघून झाले मी आनंदी
आणि खुशीत तुला धरूनी जाणवले ….जणू कृष्णच माझ्या हाती .

जश्या साऱ्या भाच्यांचे पुरवले लाड आजवरी
प्रयत्न सारे करिन तुझेही लाड पुरवण्यासाठी

पिल्लू गुड्डू बाळा म्हणून थकलो आम्ही सारे
तुला जगात ओळख मिळavi
म्हणून आज जमलो आम्ही सारे ,म्हणून आज जमलो आम्ही सारे .

⛔ शिवानी झाडे ⛔
◽कवयित्री चंद्रपूर◽