Home Breaking News विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन; डॉ. प्रेमकुमार नाईक यांचा सत्कार

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन; डॉ. प्रेमकुमार नाईक यांचा सत्कार

129
Oplus_131072

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन; डॉ. प्रेमकुमार नाईक यांचा सत्कार

चंद्रपूर  किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानस बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम १४ एप्रिल २०२६ रोजी शासकीय क्रीडा विभागाजवळ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सामाजिक ऐक्य, बंधुभाव व समतेचा संदेश देणारा हा सोहळा विशेष ठरला.

कार्यक्रमास वर्धा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये सन्माननीय खासदार अमर काळे, ज्येष्ठ समाजसेवक समीर देशमुख, समाजसेवक नितेश कराळे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, प्रवीण पेठे राजू धमाने यांचा समावेश होता.

कार्यक्रमादरम्यान डॉ. प्रेमकुमार दिलीपराव नाईक यांना पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार खासदार अमर काळे, समीर देशमुख, राजू धमाने , नितेश कराळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. प्रेमकुमार नाईक यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

तसेच या कार्यक्रमाला मानस संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

एकूणच, या महाप्रसाद सोहळ्याद्वारे समाजामध्ये बंधुभाव, समता आणि सामाजिक ऐक्याचा प्रभावी संदेश पोहोचविण्यात आला.