Home Breaking News संत शिरोमणी सावता महाराज चंदनउटी उत्सव उत्साहात संपन्न पालकमंत्री जयकुमार गोरे...

संत शिरोमणी सावता महाराज चंदनउटी उत्सव उत्साहात संपन्न पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती

58

संत शिरोमणी सावता महाराज चंदनउटी उत्सव उत्साहात संपन्न

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती

सुवर्ण भारत : किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनिधी

सोलापूर :   संत शिरोमणी सावता महाराज यांचा पारंपरिक चंदनउटी उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उत्सवाला हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावत भक्तीचा सागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.

संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. कीर्तन, भजन आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरण भारावून गेले होते. या सोहळ्याला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या प्रसंगी विमलताई माळी यांनी आपल्या स्वरचित दोन कवितासंग्रहांची प्रत पालकमंत्र्यांना भेट देत साहित्यिक अभिव्यक्तीचीही झलक सादर केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक ग्रामस्थ व आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. उत्सवाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने कार्यक्रम भव्य आणि संस्मरणीय ठरला.